९४ सालच्या चुकीमुळे फुर्तादोंना पश्‍चाताप

0
88

९४ साली आपण कॉंग्रेस पक्ष सोडून पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याचा आपणाला आता पश्‍चाताप होत असल्याचे सुरेंद्र फुर्तादो यांनी काल पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले. आपण त्यावेळी कॉंग्रेस पक्ष सोडून अपक्ष म्हणून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवली नसती तर मनोहर पर्रीकर यांचा पराभव झाला असता. आपण तेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याने कॉंग्रेसची मते फुटली व पर्रीकर यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचा दावा श्री. फुर्तादो यांनी यावेळी केला.