६५ वर्षीय इसमाचा विहिरीत बुडून मृत्यू

0
7

मोंत (आराडी) गिरी-म्हापसा येथे घराच्या समोर असलेल्या विहिरीत पडून रामकृष्ण दामोदर वेळूस्कर (६५ वर्षे) या इसमाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी २.३० च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण वेळुस्कर हे आपल्या घरासमोर असलेल्या विहिरीच्या पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गेले होते, त्यावेळी तोल जाऊन ते विहिरीत पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला व पोलिसांना मिळताच दलाच्या जवानांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान ज्ञानेश्वर सावंत, नितीन चोडणकर, सुनील बाणावलीकर, प्रवीण गावकर, संजू कोरगावकर, अशोक वळवईकर यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक रिचा भोसले यांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.