६५ लाखांची रेती न्हयबाग येथे जप्त

0
113

उपजिल्हाधिकार्‍यांची कारवाई; १० होड्या ताब्यात
पेडणेचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी काल पहाटे न्हयबाग-पोरस्कडे भागातील तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणार्‍यांवर धाड घालून १० होड्या जप्त केल्या तसेच ६५ लाखांची सुमारे ३५० क्युबीक रेती जप्त केली. यावेळी त्यांच्यासोबत मामलेदार, पोलीस होते. कारवाईच्या वेळी रेती काढण्यात गुंतलेल्या कामगारांनी कारवाईची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे कुणाला अटक होऊ शकली नाही. आतापर्यंत उपजिल्हाधिकारी गाड यांच्या नेतृत्वाखाली कॅप्टन ऑफ पोर्ट, खाणि आणि उद्योग खात्याच्या अधिकार्‍यांनी घातलेली ही सर्वात मोठी धाड असून यात सापडलेल्या प्रत्येक होडीला प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अचानक घातलेल्या धाडीमुळे पेडणे तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणार्‍या रेती व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.