विशेष म्हणजे ‘नोटा’ या पर्यायाला देशभरात मिळालेल्या मतांची टक्केवारी २१ पक्षांच्या मतांच्या वाट्यापेक्षा मोठी आहे. ५४३ जागांसाठी मिळून एकूण ५९,९७,०५४ जणांनी ‘वरीलपैकी कोणीच नाही’ पर्यायाची निवड केली. त्याचा वाटा एकुण मतांच्या १.१ टक्के आहे. ‘नोटा’साठी मिळालेली मते ही जनता दल – संयुक्त, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जनता दल – निधर्मी व शिरोमणी अकाल दल यांच्यापेक्षा जास्त आहेत.
पुडुचेरीत या पर्यायाचा सर्वात जास्त वापर झाला. तेथे एकुण मतदानाच्या ३ टक्के मते ‘नोटा’ पर्यायासाठी होती. जी सुमारे २२,२६८ एवढी होतात.
त्यानंतर मेघालय २.८ टक्के (३०,१४५), गुजरात १.८ टक्के (४,५४,८८०), छत्तिसगढ १.८ टक्के (२,२४,८८९), दादरा नगर हवेली १.८ टक्के (२,९६२) असा राज्यांचा क्रमांक लागतो.
‘नोटा’ पर्यायाचा लक्षणीय वापर करणारी इतर राज्ये अशी –
बिहार १.६ टक्के (५,८१,०११), उदिशा १.५ टक्के (३,३२,७८०), मिझोरम १.५ टक्के (६,४९५), झारखंड १.५ टक्के (१,९०,९२७), दमण दीव १.५ टक्के (१,३१६). सिक्कीम १.४ टक्के (४,३३२), तामीळनाडू १.४ टक्के (५,८२,०६२), मध्य प्रदेश १.३ टक्के (३, ९१,८३७).
त्रिपुरा १.२ टक्के (२३,७८३), केरळ १.२ टक्के (२,१०,५६१), गोवा १.२ टक्के (१०,१०३), राजस्थान १.२ टक्के (३,२७,९०२), उत्तराखंड १.१ टक्के (४८,०४३), पश्चिम बंगाल १.१ टक्के (५,६८,२७६), अरुणाचल प्रदेश १.१ टक्के (६,३२१).
‘नोटा’ पर्यायाचा उपयोग अल्प प्रमाणात झालेल्या राज्यांत लक्षद्वीप ०.३ टक्के (१२३), हरयाणा ०.३ टक्के (३४,२२५), नागालँड ०.३ टक्के (२,६९६), पंजाब ०.४ (५८,७५४).
अन्य राज्यांतही तुरळक प्रमाणात या पर्यायाचा वापर दिसून आला.
वडोदरा मतदारसंघात जेथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडून आले आहेत, तेथे ‘वरीलपैकी कुणीच नाही’ पर्यायाला १८,०५३ मते पडली. या मतांचा क्रमांक प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे मधुसुदन मिस्त्री यांना मिळालेल्या मतांनंतर लागतो.

