Home बातम्या ५ रोजी भाजपचा विधानसभेवर मोर्चा

५ रोजी भाजपचा विधानसभेवर मोर्चा

0

१९ डिसेंबर २०१० ते १९ डिसेंबर २०११ हे गोवा मुक्तीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षी राज्यातील गरीब लोकांसाठी सरकारतर्फे विविध नव्या योजना सुरू कराव्यात असा सूर विधानसभेतून व्यक्त करण्यात आला होता.

सरकारनेही योजना सुरू करण्याचे मान्य केले होते. मात्र, आता सुवर्ण महोत्सवी वर्ष संपण्यास केवळ तीन महिने बाकी असून सरकारने मात्र एकही योजना सुरू न केल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व नाराजी व्यक्त केली. सुवर्णमहोत्सवी वर्षांत गोव्यातील लोकांसाठी विविध योजना सुरू करणार असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले होते. त्यामुळे ते जनतेवर योजनांच्या पाऊस पाडतील असे दिसले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी एकही योजना सुरू केली नसल्याचे ते म्हणाले. या उलट लोकांचा विरोध असताना इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. उटाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले व त्यातूनच बाळ्ळी येथे जळीतकांड घडल्याचे पर्रीकर म्हणाले.

गृहखात्याने दुर्लक्ष केल्याने पोलीस खाते तर पार बदनाम होऊन गेलेले असून अमली पदार्थ, बनावट नोटा, वासनाकांड आदीत पोलीस खाते पार रुतले असल्याचे पुरावे सापडले असल्याचे पार्सेकर म्हणाले. नोकरभरतीत तर प्रचंड भ्रष्टाचार होऊ लागलेला असून वशिला असलेल्यांना नोकर्‍या मिळत असल्याचे व गरज नसताना नवी नवी पदे निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गरज नसताना पेशंट अटेंन्डन्टसारखी पदे मोठ्या प्रमाणात भरली जात असल्याचे ते म्हणाले.

बेकायदेशीर खाणींची जबाबदारी खाणमंत्र्यांची

राज्यातील बेकायदेशीर खाणींची जबाबदारी खाण मंत्री या नात्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना घ्यावीच लागणार असल्याचे भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.

जोपर्यंत मोजकेच लोक खाण व्यवसायात होते व राजकारण्यांनी खाण व्यवसायात प्रवेश केलेला नव्हता, तोपर्यंत राज्यात बेकायदेशीर खाणी सुरू झाल्या नव्हत्या. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्यासह बहुतेक कॉंग्रेस मंत्री व आमदारांच्या खाणी असून त्यातील बहुतेक बेकायदेशीर असल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला.

भाजप सरकारच्या काळातही दिगंबर कामत हेच खाण मंत्री होते, असे सांगून तेव्हा खाण भ्रष्टाचार झाला नव्हता काय, असे पत्रकारांनी विचारले असता तेव्हा खाण खात्याला काहीही महत्त्व नव्हते. बेकायदेशीर खाणी सुरू झाल्या नव्हत्या. नंतर दिगंबर कामत यांनीच कॉंग्रेस राजवटीत खाते भ्रष्टाचाराचे आगर बनवल्याचा आरोप त्यांनी केला. ज्योकीम आलेमाव, विश्‍वजित राणे आदी मंत्री आपणाच्या खाणी नाहीत असे सांगतात, असे त्यांच्या नजरेत आणून दिले असता ज्यांच्या नावावर एकही खाण नाही तेच खरे खाण व्यवसायात असल्याचे पार्सेकर म्हणाले.