२६/११ : अमेरिकेकडून आयएसआयसाठी शिफारस

0
49

२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याच्या मृतांच्या नातेवाइकांनी अमेरिकेत सादर केलेल्या याचिकेतून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला वगळावे असे अमेरिकेने सांगितले असून भारताने याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

कुठलीच संघटना, देश किंवा कुणीही दहशतवादाला मदत करीत असेल तर त्याला कसे वगळता येईल, असा प्रश्‍न भारताने उपस्थित केला आहे. आयएसआय वा कुणीही ज्याचा या हल्ल्याशी संबंध असेल त्यांना खटल्याचा भाग करावे, असे मत भारताने अमेरिकेला कळविले आहे.