२० अधिकार्‍यांच्या बदल्या

0
50

बढत्या देऊन वेगवेगळ्या पदांवर नियुक्त केलेल्यांमध्ये संगीता राऊळ (अवरसचिव आरोग्य २), उमाकांत कोरगावकर (उपजिल्हाधिकारी व एसडीओ दक्षिण गोवा, मडगाव), फ्रान्सलिना ओलिव्हेरा (अवर सचिव सार्वजनिक तक्रार विभाग), परेश फळदेसाई (सहाय्यक आयुक्त वाणिज्य कर), सुधीर केरकर (उपआयुक्त महापालिका, पणजी), सतीश बी. देसाई (अतिरिक्त संचालक, पालिका प्रशासन), संगीता एस. नाईक (दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक).

अन्य बदली करण्यास आलेल्या अधिकार्‍यांमध्ये स्नेहल पी. नाईक गोलतेकर (दक्षता खात्यांच्या उपसंचालक), संतोष एस. कुंडईकर (उपजिल्हाधिकारी डीआरओ, दक्षिण गोवा), नीला एस धारवाडकर (प्रशासकीय उपसंचालक, माहिती तंत्रज्ञान), प्रवीण एम. एस. बरड (मुख्याधिकारी कुंकळ्ळी पालिका), शिवाजी बी. देसाई (मुख्याधिकारी केपे पालिका), कॅथरिन फर्नांडिस (प्रशासकीय उपसंचालक जलस्रोत खाते), दशरथ रेडकर (उपसंचालक पंचायत), यशवंत कामत खाडये (उपसंचालक वन), वासुदेव एन. शेट्ये (उपसंचालक, दक्षिण गोवा पंचायत), एन. पी. सिग्नापुरकर (प्रशासकीय उपसंचालक दंत महाविद्यालय), महादेव आरोंदेकर (प्रशासकीय उपसंचालक महिला आणि बाल विकास खाते) व भूषण के. सावईकर यांची बदली मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवपदी केली आहे.