१७ पासून कुमुदिनी उसगावकर व्याख्यानमाला

0
86

माधव गाडगीळ, उत्तम कांबळे, सोनाली कुलकर्णी यांची व्याख्याने

रोटरी क्लब ऑफ म्हापसाने येत्या गुरुवार दि. १७ पासून पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात स्व. कुमुदिनी उसगांवकर स्मरणार्थ व्याख्यानमाला आयोजित केल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष साल्वादोर पिंटो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

स्व. कुमुदिनी उसगावकर यांचे समाजाला फार मोठे योगदान असून त्यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले. दि. १७ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ‘पर्यावरण’ या विषयावर डॉ. माधव गाडगीळ यांचे व्याख्यान होईल. दि. १९ रोजी ‘भारत विरुध्द इंडिया’ या विषयावर ‘सकाळ’ समूहाचे संपादक व लेखक उत्तम कांबळे यांचे, तर दि. २० रोजी प्रसिध्द अभिनेत्री तथा समाजसेविका सोनाली कुलकर्णी यांचे ‘चित्रपट जगत व सामाजिक जागृती’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती पिंटो यांनी दिली.

गेल्या वर्षी रोटरी क्लबने ‘अर्पण’ व्याख्यानमाला आयोजित केली होती. दरवर्षी हा उपक्रम राबविण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस ऍड्. मनोहर उसगांवकर, गुरुप्रसाद पावसकर, सतीश सोनक व ‘मिळून सार्‍याजणी’ या संस्थेच्या उज्ज्वला आचरेकर उपस्थित होत्या.