१३० इंग्रजी शाळांच्या अनुदानास विरोध

0
56

वरील १३० शाळांना २०११-२०१२ या एका वर्षाच्या काळात २४,७७,२८,१३५ रु. एवढा निधी अनुदानाच्या रुपात देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. वरील शाळांपैकी एका-एका शाळेला अनुदानाच्या रुपात महिन्याला १ लाख ६० हजार रु. एवढा निधी मिळत असल्याचे सांगून मातृभाषेतून नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या शाळेला स्थापनेच्या वेळी १७ लाख रु. व नंतर मात्र महिन्याला अवघे २४ हजार रु. एवढे अनुदान दिले जात असल्याचे ‘गेट वेल सून’च्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

२०११ या वर्षी शिक्षण खात्याकडून कोणतीही परवानगी न घेता वरील १३० शाळांनी आपले माध्यम बदलले होते. माध्यम बदलण्यासाठी या शाळांनी परवानगी मागणारा जो पत्रव्यवहार केला होता त्यासंबंधीची कागदपत्रे आम्ही शिक्षण खात्याकडे मागितली असता शिक्षण खाते ती देऊ शकली नसल्याचे युगांक नाईक यांनी सांगितले.