१६व्या लोकसभेसाठी तिसर्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यात ११ राज्यांतील ९२ जागा व ११ कोटी मतदारांचा समावेश आहे. आज होणार्या निवडणुकीत राजधानी दिल्लीच्या ७ मतदारसंघांत तसेच उत्तर प्रदेशमधील दहा मतदारसंघांचा समावेश असून यात दंगलप्रभावित मुझफ्फरनगर भागातही मतदान होईल.
आजच्या टप्प्यातील मतदानात १४१८ उमेदवार रिंगणात असून यात लोकसभा सभापती मीरा कुमार, तसेच सात केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य मशिनबंद होईल. आजच्या टप्प्यात उमेदवार असलेल्यांत कपिल सिब्बल, कमल नाथ, शशी थरूर, अजित सिंग यांचा समावेश आहे. माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांचाही आजच्या उमेदवारांत समावेश आहे. शिवाय राज बब्बर, जया प्रदा, नगमा या तारकांचाही निकाल मतदार आज लावणार आहेत.
छत्तिसगढ, बिहार, मध्य प्रदेश, केरळ, हरयाणा, उदिशा या अन्य राज्यांचा आजच्या टप्प्यात समावेश आहे.

