११ पालिकांची निवडणूक अखेर तीन महिने लांबणीवर

0
334

राज्यातील अकरा नगरपालिका मंडळांची येत्या १८ ऑक्टोबरची नियोजित निवडणूक कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

निवडणुकीसाठी ऑनलाइन मतदान घेण्यासाठी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत निर्णय झालेला नाही.