१०९ वर्षीय वृध्देने केले मतदान

0
58
श्रीमती लिलावती नाईक या वाडे वास्को येथे गोवा शिपयार्ड नजीक आपली सून, नातसून, नातू आणि पणतू यांच्यासमवेत राहतात. कमरेतून वाकून चालल्या तरी त्यांची दृष्टी अजून चांगली आहे. अजून चष्मा लागलेला नाही असे तिच्या नातसून प्रज्ञा हिने पत्रकारांना सांगितले. आरोग्याच्या बाबतीतही त्या चांगल्या आहेत. फक्त गेल्या दोन वर्षात ऐकायला कमी येते. खाण्या पिण्याच्या बाबतीतही त्या शाकाहारी व मांसाहारी या दोन्हींचा आस्वाद घेतात असे सांगण्यात आले.

फोंडा तालुक्यातील कपिलेश्‍वरी हे त्यांचे माहेर असून आडपई येथील कै. उत्तम नाईक यांच्याशी विवाहानंतर गेल्या ८० वर्षांपूर्वी त्या वास्कोत कामानिमित्त स्थायिक झाल्या. 
निवडणुकीत मत कुणाला देणार असे विचारले असता त्यानी कोणास ठाऊक असे उत्तर दिले. त्यावरून दिसून आले की त्यांनी आपले मत राखून ठेवलेले आहे.