‘१०८’ कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू

0
245

राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांनी कालपासून आंदोलन उग्र केले असून ६ कर्मचार्‍यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हे सहा कर्मचार्‍यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत फक्त पाण्यावर जगण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या कर्मचार्‍यांनी १० दिवस साखळी उपोषण केले होते.