१०० कॉंग्रेसजनांचे सोनियांना नेतृत्वबदलासाठी पत्र

0
139

>> संजय झा यांच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

कॉंग्रेसच्या सुमारे शंभर नेत्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून पक्षाचे राजकीय नेतृत्व बदलावे व पक्षामध्ये त्यासाठी पारदर्शकपणे संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचा दावा काल कॉंग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते संजय झा यांनी केल्याने प्रचंड राजकीय खळबळ माजली. मात्र, कॉंग्रेस पक्षाने नंतर हा दावा फेटाळताना झा हे आता कॉंग्रेसमध्ये नसून ते भाजपचे हस्तक बनले असल्याचा प्रत्यारोप केला. झा यांना गेल्या महिन्यात पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

काही खासदारांसह सुमारे शंभर कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून पक्षाचे राजकीय नेतृत्व बदलावे अशी मागणी केली असल्याचा दावा संजय झा यांनी काल ट्वीटरवरून केला होता. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे कॉंग्रेसच्या वतीने नंतर सांगण्यात आले. संजय झा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून ते पक्षात नसल्याने भाजपच्या सांगण्यावरून अफवा पसरवत आहेत, असा दावा कॉंग्रेसने केला.