30 C
Panjim
Monday, April 19, 2021

ॐ उपासना महत्त्वाची

योगसाधना – ४९६
अंतरंग योग – ८१

 • डॉ. सीताकांत घाणेकर

आपण जीवनभर श्‍वास नकळत घेतो. त्याच्याशिवाय आपले अस्तित्वच नाही. पण त्याच्यामध्ये जो प्राणवायू आहे त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्याचे महत्त्व कितीजण समजून घेतात.

विश्‍वात प्रतीकांचे महत्त्व अपरंपार आहे. आपल्यातील प्रत्येकजण रोजच्या जीवनांत विविध वेळी सहज, कळत नकळत अनेक प्रतीकांचा वापर करतो. फक्त हे एवढ्या सहजतेने होते की सामान्य माणसाच्या ती गोष्ट लक्षातच येत नाही. आपल्या निवडणुकीतही निशाणीवरच मतदान चालते. अशिक्षित व्यक्तीला नाव वाचता येत नाही. पण ज्याला मत द्यायचे असेल त्याचे चिन्ह तो सहज ओळखू शकतो. कारण तेच त्याचे प्रतीक असते. ते बघून तो आपले मतदान अगदी सहज करतो.

प्रत्येक संस्कृतीची एक महान विचारधारा असते. त्या विचारामागे फार मोठे तत्त्वज्ञान असते. प्रतीकाच्या माध्यमाने सहज, सरळ रीतीने अगदी संक्षेपात ती व्यक्त होऊ शकते. उदा. –
१) ‘कमळ’- म्हणजे विरक्त वृत्तीने संसार करताना अगदी सन्यस्त जीवन जगणारी व्यक्ती. ‘जलकमलवत्’- एवढे जरी म्हटले तरी त्या व्यक्तीची पुष्कळशी ओळख सहज होते. पाण्यामध्ये व चिखलामध्ये वाढणार्‍या कमळाला त्यांचा स्पर्श होतो पण त्यांच्यापासून कमळ अलीप्त असते.
२) ‘उंबरठा’ – प्रत्येक घराच्या दारात एक उंबरठा असायलाच हवा. घरातून बाहेर जाताना व बाहेरून परत घरात येताना प्रत्येक व्यक्ती उंबरठा ओलांडूनच बाहेर जाते व आत येते. त्या उंबरठ्याचे रोज रांगोळी घालून पूजन करायचे असते. आजही पुष्कळ घरांमध्ये ही पद्धत काटेकोरपणे पाळली जाते. हा उंबरठा कुटुंबाला जीवनांत पाळावयाच्या विविध सूचना देत असतो.
३) ‘तिलक’ – म्हणजे बुद्धीपूजनाचे प्रतीक. हा तिलक कपाळाच्या मध्ये (भ्रूमध्य) लावायचा असतो. ते बुद्धीचे स्थान आहे असे भारतीय मानतात. योगशास्त्रामध्ये ते आज्ञाचक्राचे स्थान आहे. तिथे चंदन किंवा गंध किंवा कुंकू लावत असत. आजच्या काळात ती प्रथासुद्धा कमी झाली आहे.
४) ‘मृत्तिकाकुंभ’ – मृत्युनंतर स्मशानयात्रेत हा कुंभ नेला जातो. मानव जीवनाच्या नश्‍वरतेचे व क्षणभंगुरत्वाचे ते दर्शक आहे.
५) ‘स्वस्तिक’ – भारतात प्रत्येक शुभकार्यात या प्रतीकाचा आवर्जून उपयोग केला जातो- सर्वच शुभकार्यात. त्यामुळे कार्याचे मांगल्य व पावित्र्य दर्शवले जाते. पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रतीकांवर भाष्य करताना सांगतात-
‘‘याप्रमाणे प्रतीकाची उपासना जर जागृत व ज्ञानपूर्वक करण्यात आली तर हे सांस्कृतिक संकेत आपल्या जीवनांत प्रेरक, पोषक, प्रोत्साहक किंवा कार्यसाधक बनतील. संस्कृतीची सर्वच प्रतीके आपण संपूर्णरीत्या समजलो आहोत, असे समजणे हे बौद्धिक दिवाळे समजले जाईल. त्यांची उपासना किंवा यथाशक्ती पूजा करता येते. तशीच बुद्धीची कृतज्ञता किंवा जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या जीवनांत अशा प्रकारची कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो… अशी भगवान योगेश्वराच्या चरणी प्रार्थना’’.

महापुरुषांकडून अशा गोष्टी माहीत झाल्या की अनेक विचार मनात येतात-
१. हे सर्व महापुरुष आम्हाला ज्या गोष्टी नगण्य वाटतात त्यावर किती सखोल विचार व चिंतन करतात. तदनंतर आम्हाला सोप्या, साध्या शब्दात – जे सामान्यांना समजेल- सर्व कठीण तत्त्वज्ञान समजावतात. मला वाटते की ह्यांचा विश्‍वाकडे बघण्याचा दृष्टिकोण फार विस्तृत आहे. भगवंताने अत्यंत कष्टाने रचलेल्या या विश्‍वावर त्यांचे जिवापाड प्रेम आहे. त्या कर्तव्यापोटी व कृतज्ञतेपोटी या व्यक्ती निस्वार्थ वृत्तीने अथक कार्य करतात. ते खरे ज्ञानयोगी- भक्तियोगी- कर्मयोगी आहेत.
२. आणि आपण… सर्व उत्सव कर्मकांडं समजून मौजमस्तीतच करतो. त्यामागील उच्च भाव समजून घेत नाही. तसेच अगदी सामान्य वाटणारी प्रतीकेसुद्धा किती ज्ञान देतात! आपले तर बहुतेकवेळा अज्ञान व विपरीत ज्ञानच असते.
३. विश्‍वाचे व मानव जीवनाचे गूढ तत्त्वज्ञान या उत्सव व प्रतीकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचे महान कार्य आपल्या महान ऋषीमहर्षींनी केले. आता तेच पवित्र काम असे महापुरुष करतात. कमी पडतो आपण. नियमित अभ्यास, चिंतन व आचरण बहुतेकांच्या हातून घडतच नाही.
आपल्या प्रवचनांमधून शास्त्रीजी तत्‌पश्‍चात प्रत्येक प्रतीकावर मौल्यवान भाष्य करतात. या दीर्घ प्रवासावर आपण सर्वजण जाऊन ज्ञान व आनंद घेऊया. (त्यांच्या प्रवचनांवर आधारित ‘संस्कृती पूजन’).
ॐ (ओंकार) –
ओंकारः सर्वमंत्रणामुत्तमः परिकीर्तितः |
ओंकारेण प्लैनैव संसारानि तरिस्यसि ॥

 • सर्व मंत्रांमध्ये ओंकार उत्तम रीतीने ख्याति पावलेला आहे. ओंकाररूपी होडीनेच संसार- सागर तरू शकू.
  खरेच किती खोल व आशादायक अर्थ आहे त्या छोट्याशा श्‍लोकात. आपल्यातील काही व्यक्तींना याबद्दल थोडे ज्ञान आहे. पण ते ज्ञान अपूर्ण की विपरीत आहे- हा संशोधनाचा विषय आहे. असे म्हणायचे कारण म्हणजे अशा व्यक्ती हातात माळा घेऊन अखंड ‘ॐ’चा जप करतात. त्यामागील तत्त्वज्ञान किती जणांना माहीत असेल? मला तरी माहीत नाही.
  गीतेच्या पहिल्या अध्यायात (अर्जुनविषादयोग) अर्जुन मृत्यूबद्दल शोक करतो व जीवनाचे मोठमोठे तत्त्वज्ञान भगवान कृष्णाला सुनावतो. म्हणून लगेच दुसर्‍या अध्यायात (सांख्य योग) अर्जुनाला त्याच्या (क्षत्रियांच्या) कर्तव्याबद्दल सांगतात. तदनंतर त्याला आत्म्याच्या अमरत्वाविषयी ज्ञान देतात.

जातस्त हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च |
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥

 • जो जन्मला त्याला मृत्यू निश्‍चित आहे आणि जो मेला त्याला जन्म निश्‍चित आहे. म्हणून या अपरिहार्य गोष्टीचा शोक करणे उचित नाही.
  हे माहीत असूनदेखील बहुतेकजण मृत्यूला घाबरतात. तो येणार हे माहीत झाले की रडतात. अथवा दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण मृत्यू ही घटना अटळ आहे. त्याच्यापासून सुटका होणे शक्यच नाही. अगदी देवादिकालादेखील मृत्यूपासून सुटका नाही. पण मृत्यूची भीती त्यांनाही आहे. याबद्दल काही कथा सांगितल्या जातात.
  कथा १ – मृत्युच्या पाशातून सुटण्यासाठी देवांनी वेदत्रयीचा आश्रय घेतला. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणून वेदांना छन्दस् अशी संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्यूने देवांचा पाठलाग केला. तेव्हा देवांनी ओंकाराचा आश्रय घेतला. हा ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले दुर्गम व अभेद्य स्थान. तेथे मृत्यूला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे देव अमर झाले.
  ओंकाराचे हे सामर्थ्य माहीत झाल्यामुळे उपनिषदांच्या ऋषींनी मानवाला सल्ला दिला की त्यांना मृत्यूच्या भीतीपासून सुटका हवी असेल तर त्यांनी ओंकारोपासना नियमित करावी.

ही आख्यायिका छांदोग्य उपनिषदात आहे. शास्त्रीजी ओंकाराचा महिमा संपूर्ण समजावतात –

 • ओंकार म्हणजे वेदत्रयीचे सार. ओंकाराची विद्या ही अक्षरविद्या आहे. अक्षर म्हणजे अविनाशी आणि अविनाशी म्हणजे परब्रह्म.
 • ओमित्येकाक्षरं ब्रह्म – या शब्दात भगवंताने त्याचा महिमा वर्णन केला आहे. ते पुढे म्हणतात- वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर्ग मिळेल पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात् अमृतत्वाची प्राप्ती होते.
  आपल्यातील प्रत्येकाला स्वर्ग कसा आहे हे बघायची इच्छा व आतुरता आहेच पण त्यापुढे जाऊन जर अमरत्व मिळाले तर त्याहून चांगले.
  म्हणूनच आपण एक प्रार्थना नियमित म्हणतो- ‘मृत्योर्माऽअमृतं गमय…’
  भारतीय साहित्यात जीवनाबद्दल अशी अनेक गूढतत्त्वे उपलब्ध आहेत. नेहमीच्या जीवनांत त्यांचे दर्शन होत असतेच पण त्यांचे महत्त्व शोधण्याचा आम्ही प्रयत्नच करीत नाही. त्याबद्दल जिज्ञासाच नाही. आम्हाला पाहिजे त्या भौतिक गोष्टी व वस्तु ज्या नाशवंत आहेत.
  आपण जीवनभर श्‍वास नकळत घेतो. त्याच्याशिवाय आपले अस्तित्वच नाही. पण त्याच्यामध्ये जो प्राणवायू आहे त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्याचे महत्त्व कितीजण समजून घेतात. जीवन चालले आहे… झाले. तसेच कृतकृत्य होतो.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...