अभिनेता ह्रतिक रोशनच्या मेंदुवर काल येथील इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळणार असल्याचे वडील राकेश रोशन यांनी सांगितले. ३९ वर्षीय ह्रतिकला डोक्याच्या दुखापतीमुळे मेंदुत रक्तस्राव झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करावी लागली.
काही दिवसांपूर्वी त्याला ही दुखापत झाली होती. दुखापत नेमकी कशी झाली याबाबत त्याच्या वडलांनी सांगण्याचे टाळले. त्याला शस्त्रक्रियेसाठी काल सकाळी हिंदुजा इस्पितळात दाखल केले होते. आपल्या शस्त्रक्रियेबाबत ह्रतिकने ङ्गेसबूकद्वारे सगळ्यांना कळविले होते. दरम्यान, ह्रतिकचा महत्त्वाकांक्षी ‘क्रिश ३’ हा सिनेमा नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होणार असून त्याची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे.