हॉटेल, व्यायामशाळा सुरू होणे शक्य ः लोबो

0
153

लॉकडाऊन ४ मध्ये राज्यातील लहान हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाउस, व्यायामशाळा सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर मान्यता दिली जाऊ शकते, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
लॉकडाऊन ४ येत्या १८ मेपासून सुरू होणार आहे. राज्य हरित विभागात असल्याने लहान हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाउस, व्यायाम शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. रोजगार उपलब्ध करण्यासाठी बंद असलेले काही व्यवसाय सुरू करण्याबाबत एकमत झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक लवकर घेण्याची घाई नाही. राज्यातील मतदार सुध्दा निवडणुकीच्या मनस्थितीत नाहीत. मुख्यमंत्री, मंत्री यांच्याबरोबर जिल्हा पंचायत निवडणुकीवर चर्चा झालेली आहे, असेही लोबो यांनी सांगितले.