हेलिकॉप्टर अपघातात चार जणांचा मृत्यू

0
11

ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरचे मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यावेळी हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि ओएनजीसीचे सात कर्मचारी होते. आतापर्यंत नऊ जणांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुंबई पश्चिमेकडील सागर किरण ऑईल रिगजवळ हा अपघात झाला. फ्लोटर्सच्या मदतीने हेलिकॉप्टरला काही वेळ बुडण्यापासून वाचवण्यात यश आले. त्यामुळे पाच जणांना वाचवण्यात यश आले.