येथील हेडगेवार हायस्कूलचा दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागण्याची या संस्थेची ही सलग सातवी वेळ ठरली आहे. या संस्थेचे ६५ टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत, २८ टक्के प्रथम श्रेणीत व सात टक्के दुसर्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तर १६ विद्यार्थ्यांनी ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. या विद्यालयात श्रेया बांबोळकर ही ९६.८ टक्के गुणांसह प्रथम आली आहे.