हुतात्मा स्मृती स्मारकाचे आज उद्घाटन

0
16

पत्रादेवी येथील नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मृती स्मारकाचे उद्घाटन बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

गोवा मुक्ती चळवळीतील हुतात्म्यांना आणि राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला आदरांजली म्हणून गोवा सरकारने हे स्मारक उभारले होते. आता, राज्य सरकारने जुन्या स्मारकाचे नूतनीकरण करून भव्य स्मारक उभारले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे कोलवाळ ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी 4 ते रात्री 8 यावेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. या काळात अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल किंवा अवजड वाहने विविध ठिकाणी थांबवून ठेवली जाऊ शकतात, असे आदेशात म्हटले आहे.