हिमाचल प्रदेश, गुजरातची मतमोजणी आज

0
45

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणी आज सकाळी ८ वा. पासून सुरू होईल. गुजरातमध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सत्ता स्थापन करतील तर भाजपप्रणित हिमाचलमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापनेत यशस्वी ठरेल असे अंदाज बाह्य मतदान चाचण्यांनी वर्तविले आहेत.

गुजरातच्या १८२ सदस्यीय विधानसभेसाठी एकूण ७१.३२ टक्के मतदान झाले होते. आज एकूण ३३ ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होत आहे. येथे भाजप, कॉंग्रेस व माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीत लढत होती.
हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागांसाठी ७४.७ टक्के मतदान झाले होते.