हिमाचलप्रदेशमधील आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

0
19

>> उद्या होणार मतदान

देशात निवडणुकांचे वारे असून दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सध्या हिमाचल प्रदेशात सर्वच पक्षांकडून निवडणूक प्रचाराचा धडाका लावला आहे. आजच प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आचारसंहिता लागू होणार आहे.
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथील ६८ जागांसाठी उद्या शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. हिमाचलमधील निवडणूक प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.