‘हिट अँड रन’ खटल्याला नवे वळण

0
162

अभिनेता सलमान खान आरोपी असलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाला काल नवे वळण मिळाले. सलमान खानचा वाहनचालक अशोककुमार सिंह याने अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत नव्हता तर आपण चालवत होतो, अशी कबुली न्यायालयात दिली. पोलिसांनाही त्याने अशीच माहिती दिली होती असेही त्याने न्यायालयाला सांगितले. गेल्या आठवड्यात या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी सलमानने स्वतःवरील सर्व आरोप ङ्गेटाळून लावताना अपघातावेळी आपण गाडी चालवत नसल्याचा युक्तिवाद केला होता. या पार्श्‍वभूमीवर सलमानच्या वाहनचालकाच्या कबुलीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे.