29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

हायड्रॉलिक पंप समुद्रात पडल्याने नाफ्ता खेचण्याचे काम लांबणीवर

>> मुख्यमंत्र्यांची माहिती

दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या ‘नुशी नलिनी’ या नाफ्तावाहू जहाजातील दोन हजार मेट्रिक टन नाफ्ता सुरक्षितपणे काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे जे काम आज गुरुवार दि. ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंपही आणण्यात आला होता. मात्र तो पंप काल समुद्रात पडल्याने नाफ्ता बाहेर काढण्याचे काम आजपासून हाती घेता येणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आता मुंबईहून नव्याने हायड्रॉलिक पंप आणावा लागणार असल्याने वरील काम २ नोव्हेंबरपासूनच हाती घेणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काल हायड्रॉलिक पंप हेलिकॉप्टरमधून नाफ्तावाहू जहाजावर नेण्यात येत असताना तो समुद्रात कोसळल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परिणामी ‘नुशी नलिनी’ ह्या जहाजातून सुरक्षितरित्या नाफ्ता काढून तो दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम २ नोव्हेंबरपूर्वी हाती घेता येणार नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.

‘नुशी नलिनी’ हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर ते दोनापावला येथे समुद्रात अडकून पडलेले आहे. त्यामुळे या जहाजातील दोन हजार मेट्रिक टन एवढा नाफ्ता हायट्रोलिक पंपच्या आधारे एका बार्जमध्ये घालण्याचे काम आज ३१ रोजीपासून सुरू होणार होते. मात्र त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंप हेलिकॉप्टरमधून जहाजात हलवण्याचे काम चालू असताना काल तो समुद्रात कोसळला. त्यामुळे एमपीटीला आता नवा हायड्रॉलिक पंप आणावा लागणार आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

नाफ्ता जहाज आणण्यात
मिलिंदचा हात नाही ः सावंत
दरम्यान, मुरगांव बंदरात नाफ्ता जहाज आणण्यामागे मंत्री मिलिंद नाईक यांचा हात असल्याचा कॉँग्रेसचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. हे जहाज मुरगांव बंदरात आणण्यामागे मंत्री मिलिंद नाईक यांचा कोणताही हात नसल्याचे सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, सदर जहाजात जो नाफ्ता आहे तो भेसळयुक्त नाफ्ता असल्याचा दावा मिलिंद नाईक यांनी केला होता. मात्र, नाईक यांनी केलेला दावा फेटाळून लावताना जहाजातील नाफ्ता भेसळयुक्त नसून पूर्णपणे शुद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे पाठवणार नाही ः मुख्यमंत्री

गेल्या पावसाळी अधिवेशनात गोवा विधानसभेत संमत करण्यात आलेले भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे अद्याप कायदा खात्याकडेच आहे व ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवणार नसल्याचा...