भारतीय हवाई दलाने काल आपले सी-१३० जे सुपर हर्कुलीस वाहतूक विमान लडाखमध्ये जगातील सर्वांत उंचावरील दौलत बेग ओल्डी धावपट्टीवर उतरवून आपल्या सामर्थ्याची चुणूक चीनला दाखवली. या विमान वाहतुकीमुळे भारतीय हवाई दलास लडाख येथे अक्साई चीन परिसरातील नियंत्रण रेषेवर सैन्य दल नेणे, रसद पुरवणे अधिक सोपे होणार आहे.
लडाखच्या याच परिसरात चिनी सैनिकांनी भारतीय लष्कराची कुरापत काढण्याच्या घटना घडल्या होत्या. सुमारे १६ हजार फूट उंचीवरील हे हवाई ठाणे १९६२ साली भारत-चीन युद्धाच्या वेळी उभारण्यात आले होते.