हवाई दलाचे ‘मिग-२१’ राजस्थानमध्ये कोसळल

0
14

>> २ पायलट शहीद; संरक्षणमंत्र्यांकडून शोक व्यक्त

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान काल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आली आहे. या लढाऊ विमानात दोन पायलट होते, ते दोन्ही पायलट शहीद झाले आहेत. प्राण गमावलेल्या दोन्ही योद्ध्यांना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान भीमडा गावाजवळून उड्डाण घेत होते. त्याचवेळी हे विमान कोसळले. कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला. या घटनेची माहिती होताच तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. हे विमान का दुर्घटनाग्रस्त झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.