राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेत दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी संदर्भात नवे आरोप केले आहेत. हरयाणात मत चोरी करुन भाजपने सरकार आणल्याचा दावा राहुल यांनी केला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका तरुणीचे छायाचित्र दाखवत या तरुणीने विविध नावांनी 22 ठिकाणी मतदान केले. या तरुणीच्या नावावर 22 मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. तिचे नाव सीमा, तर कुठे स्विटी आहे. ही तरुणी ब्राझीलमधील मॉडेल आहे. हरियाणात 25 लाख मतांची चोरी झाली. 5 वेगवेगळ्या प्रकारे मतांची चोरी झाली असा दावा केला. हरयाणातील मत चोरी आम्ही पकडली आहे. हरयाणात आम्ही मतदारांची पडताळणी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल यांनी केला.
राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत एका पडद्यावर एका मॉडेलचे छायाचित्र दाखवले व या तरुणीने 10 मतदार केंद्रांवर 22 वेळा मतदान केले. प्रत्येक ठिकाणी नावे वेगळी होती. हरियाणात 25 लाख मतांची चोरी झाली. त्यातील हे एक ठळक उदाहरण असल्याचे सांगितले. आमच्याकडे असलेल्या एच फाईल्स’मध्ये एका संपूर्ण राज्याची माहिती कशी चोरण्यात आली, या संदर्भातील तपशील त्यात आहे. हा प्रकार केवळ एका मतदारसंघात होत नसून तो राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होत असल्याचा संशय आम्हाला आहे, असं राहुल गांधी म्हणाले. हरियाणातील आमच्या उमेदवारांकडून बऱ्याच तक्रारी आल्या. काहीतरी घोळ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आम्ही हरियाणाकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आणि तिथे घडलेल्या प्रकारांचा सखोल तपास करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल गांधी म्हणाले.

