हरिद्वार, ऋषिकेशमध्ये मकर संक्राती स्नानास बंदी

0
17

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश इथे मकर संक्रांतीनिमित्त होणारे स्नान बंद करण्यात आले आहे. मकर संक्रांतीनिमित्त याठिकाणी हजारो भाविक स्नानासाठी येत असतात पण कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता स्नान करण्यास बंदी घातली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भरलेल्या माघ मेळ्यामध्ये आत्तापर्यंत ७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये देखील गंगासागर मेळा होत आहे. तिथेही लाखो भाविक जमी झाले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने खबरदारी घेत मकर संक्रांतीच्या सणाला हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगेत स्नान करण्यास बंदी घातली आहे.

धार्मिक मेळ्यांवर
ओडिशात बंदी

दरम्यान, ओडिसातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य सरकारने मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या निमित्ताने धार्मिक मेळाव्यांवर बंदी घातली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार मकर संक्रांत आणि पोंगल या दिवशी मेळावे आणि दुसर्‍या दिवशी संपूर्ण राज्यात नदीकाठ, घाट, तलाव, समुद्रकिनारे आणि इतर जलकुंभांजवळ स्नान करण्यास बंदी असणार आहे.

देशामध्ये काही ठिकाणी अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पावले उचलली जात आहेत. झारखंडमध्ये अशा शाळा सुरू करण्यात आल्या मात्र झारखंडमध्ये ३९ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेत. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील अनेक शाळांमधील ३९ मुले पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. जामा ब्लॉकमधील चार विद्यालयातील ३४ विद्यार्थी आणि जरमुंडी, दुमका आणि शिकारीपाडा जामा ब्लॉकच्या तीन शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या मुलांचे वय ६ ते १८ वर्षे वयोगटातील आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ५,७५३ वर पोहोचला आहे.
दरम्यान, मुलांना ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होऊन त्यांच्यावर उपचार सुरू करा असे शासनाने म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या संकटात मुलांच्या आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

तिसरी लाट मुलांनाही धोकादायक
कोरोनाची तिसरी लाट इतर दोन लाटांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळेच हे लहान मुलांसाठीही धोकादायक आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांनाही संक्रमित करू शकते. त्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, बाधित झालेल्या मुलांचे वय ११ ते १७ वर्षे दरम्यान आहे. दोन वर्षांखालील मुलांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.