हरवळेतील अपघातात 1 महिला ठार; 2 जखमी

0
4

साखळी-होंडा रस्त्यावर हरवळे येथे काल सायंकाळी एका काने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. गिज्जीमोल अजितकुमार नायर (45, रा. पोस्तवाडा होंडा) असे या महिलेचे नाव आहे. तसेच अजितकुमार नायर आणि अन्य एक दुचाकीचालकही जखमी झाला.
सविस्तर माहितीनुसार, हरवळे येथे एका कारने (क्र. केए-01-एमएक्स-4113) पहिल्यांदा बुलेट दुचाकीला (क्र. जीए-04-एम-5567) धडक दिली. त्यानंतर अन्य एका दुचाकीला धडक दिली. या धडकेबरोबर बुलेटवरील गिज्जीमोल नायर आणि अजितकुमार नायर हे खाली पडून जखमी झाले. जखमींना साखळी इस्पितळात नेले असता तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालक अखिलेश जंध्या (रा. बंगळुरू) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.