हरमलमध्ये पोलिसी छाप्यात १५.४८ लाखांचे ड्रग्ज जप्त

0
6

पोलिसांनी काल सोमवारी स्टीफन स्लॉटविंजर (७६) या ब्रिटीश नागरिकाला हरमल येथे १५.४८ लाख रुपयांचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ बेकायदा बाळगल्याप्रकरणी अटक केली. सदर व्यक्तीने अमली पदार्थ भाड्याच्या जागेत लपवून ठेवले होते.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पेडणे पोलीस पथकाने हरमल येथे छापा टाकला. हरमल येथील मधलावाडा येथे स्टीफन याला अवैधरित्या १५.४८ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून हे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. पेडणे पोलिसांनी पंचनामा केला आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.