हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या

0
8

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचे वातावरण असून, त्यातच इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने काल एका निवेदनात याविषयी माहिती दिली.

तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले होते. निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया आणि एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे. तसेच पॅलेस्टाईन संघटना हमासनेही हानियाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमात हनियाची उपस्थिती आणि त्यानंतर मंगळवारी इराणच्या काही नेत्यांशी झालेल्या भेटीनंतर ही घटना घडली.

इस्रायलची अद्याप प्रतिक्रिया नाही
हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याचे हमासने म्हटले आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली
नाही.