बालरथ, हायमास्टची तोडफोड
एका माथेफिरू इसमाने हणजूण येथे गोंधळ घालून सुमारे दहा गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच तेथील चर्च मधील काचेची शोकेस व हायमास्ट दिवे फोडून सुमारे दोन लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी कुंडईकर नामक युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित कुंडईकर हा वेडसर असून काल पहाटे घराजवळील आपल्याच कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. नंतर त्याने हणजूण चर्च बाहेर आवारात उभ्या करून ठेवलेल्या सेक्रेड हार्ट हायस्कूलच्या बालरथच्या दर्शनी काच्या फोडल्या. तसेच तेथील हायमास्ट दिव्यांचीही मोडतोड केली. त्यानंतर हणजूण ते आसगाव युनियन हायस्कूल दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या सुमारे दहा गाड्या फोडल्या.
या प्रकरणी चर्चचे फा. थॉमस गोन्साल्विस यांनी हणजूण पोलिसांत तक्रार दिली. हणजूण पोलिसांनी वेडसर असलेल्या संशयित नामक कुंडईकर इसमाला अटक केली.

