हणखणे येथे वीज पडल्यामुळे राजस्थानच्या व्यक्तीचा मृत्यू

0
22

हणखणे पेडणे येथे गुरूवार दि. ४ रोजी रात्री परतीच्या जोरदार वादळी पावसानेवीज पडल्यामुळे मूळ राजस्थान येथील काळू माळी (३७) या व्यक्तीचा मृत्यू झाला. काळू माळी हे मूळ राजस्थानमधील असून हणखणे येथे आपल्या भावासह मजुरी करत होते. दिवाळी दिवशी त्याचा भाऊ आणि काही मजूर काम संपवून आपल्या खोलीकडे जात असताना वाटेत जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे एका झोपडीकडे निवार्‍यासाठी गेले. त्याचवेळी आकाशातून वीजेचा प्रवाह काळू यांच्या जवळून गेला. त्याचा धक्का बसून काळू हे जमिनीवर कोसळले. सोबत असलेल्या त्यांचा भाऊ आणि इतर तीन मजूर यामुळे हादरून गेले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी आजूबाजूला असलेले इतर मजूर जमा झाले व त्यांनी काळू यांना इस्पितळात नेले. मात्र तोवर काळू यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामाकरून मृतदेह गोमेकॉत नेला.