हडफडे येथील एका हॉटेलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेचा धक्का बसून अनिकेत पाटील (24, रा. बेळगाव) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या हॉटेलमध्ये दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी व्यासपीठ आधुनिक विद्युत उपकरणांनी सजविण्याचे कंत्राट कोल्हापूर येथील एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. अनिकेत पाटील हा त्या कंपनीसोबत संध्याकाळी हडफडे येथे दाखल झाला होता आणि इतर कामगारांसह तयारीच्या कामात गुंतला होता. काम सुरू असताना अनिकेतचा स्पर्श जिवंत वीजवाहिनीला झाला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

