स्विस पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

0
44

मध्य प्रदेश येथे घटना

आपल्या पतीसह सायकलवरून भारत भ्रमण करणार्‍या स्विस पर्यटक महिलेवर दातिया – मध्य प्रदेश येथे आठ जणांनी सामूहिक बलात्कार करण्याची घटना घडली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून चौकशीसाठी २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती चंबळचे डीआयजी डी. के. आर्या यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आली आहे.

ही घटना परवा रात्री ९च्या सुमारास घडली. आपल्या सायकलस्वारीदरम्यान, जंगल परिसरात विश्रांतीसाठी हे जोडपे थांबले असता सुमारे आठ जणांनी पतीसमोर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वैद्यकीय अहवालातही बलात्काराची झाल्याचे सिद्ध झाले आहे.