Home बातम्या स्वतःच्याच आरोपाबद्दल पर्रीकरांचे घुमजाव?

स्वतःच्याच आरोपाबद्दल पर्रीकरांचे घुमजाव?

0

कॉंग्रेसचा आरोप

दाबोळी विमानतळावर पार्किंगसाठी सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीचा काही भाग पुन्हा जमीन मालकाला दिल्याप्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी नेते मनोहर पर्रीकर करीत होते. ते आता मुख्यमंत्री बनल्यानंतर वरील प्रकरणी केलेली तक्रार नोंदवून घेऊ नये म्हणून दबाव आणीत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

भाजपने फूस दिल्यानेच एडविनो डिसोझा यांनी वरील प्रकरणी तक्रार केली होती. या प्रश्‍नावर भाजप प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिश्किता गप्प का? असा प्रश्‍न लॉरेन्स यांनी केला. प्रत्येक प्रश्‍नावर भाजप आता जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप कुडतरीच्या आमदारांनी केला.