सोने पुन्हा महाग

0
63
सोन्याचे भाव काल पुन्हा ६०५ रुपयांनी वाढले त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर आता २८ हजार ६२५ रुपये झाला आहे. गेल्या महिनाभरात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक भाववाढ होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे भाव गेल्या नऊ महिन्यांत पहिल्यांदाच वधारले आहेत.

दरम्यान, चांदीची आवक वाढल्यामुळे चांदीच्या किलोमागे दरात रु. १८०० वाढ झाली. त्यामुळे आता चांदी प्रति किलो ४४ हजार ९०० रुपये बनली आहे.  डॉलरचे मूल्य घटल्यामुळे सोन्याचे भाव काहीसे मंदावले होते मात्र आता इराकमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निवेशकांनी सोन्याला गुंतवणुकीचा पर्याय मानायला सुरूवात केल्याने भाव वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.