कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काल वैद्यकीय तपासणीसाठी काल अमेरिकेला रवाना झाल्या. त्या सुमारे आठ दिवसांनंतर परतण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत कन्या प्रियांका गेल्या आहेत. सोनिया गांधी नियमित तपासासाठी गेल्या आहेत, त्या दर सहा महिन्यांनी अशा वैद्यकीय तपासणीसाठी जातात असे कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
६६ वर्षीय कॉंग्रेस अध्यक्षांवर २०११साली अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया होण्यामागचे कारण उघड करण्यात आले नव्हते.