मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सोनसडो कबरस्तान याचिकेमध्ये आणखी दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सोनसडो कबरस्तान बांधकामासंबंधी गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणाने (सुडा) कृती अहवाल सादर केला आहे.
या बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील प्रक्रियेला चालना देण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. सदर ठिकाणी इतर धर्मीयांना स्मशानभूमीच्या मागणीसाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एका याचिकेत ख्रिश्चन समाज आणि दुसर्या हस्तक्षेप याचिकेत इतर धर्मीयांसाठी अंत्यविधीसाठी साधनसुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने या हस्तक्षेप याचिकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.