Home बातम्या सॉलिसिटर जनरल बाजू मांडणार

सॉलिसिटर जनरल बाजू मांडणार

0

इंग्रजी अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास आव्हान देणार्‍या अर्जावर आजपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याने सरकारची बाजू मांडण्यासाठी भारताचे सॉलिसिटर जनरल रोहिंगरू नरिमन येणार आहेत.

दरम्यान, वरील प्रकरणी आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केलेला अर्ज काल न्यायालयाने कामकाजात दाखल करून घेतला. सध्या सरकारच्या वरील निर्णयावर न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे.