सैन्याच्या ड्रोनमध्ये चीनी पार्ट्सच्या वापरावर बंदी

0
19

चीनमध्ये बनवलेले पार्ट्स आता लष्करी वापरासाठी भारतात बनवलेल्या ड्रोनमध्ये वापरले जाणार नाहीत. केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली असली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मानवरहित क्वाडकॉप्टर्स, स्वायत्त ड्रोन तसेच लांब पल्ल्याच्या ड्रोनसह भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार काम करत आहे. चीनमध्ये बनवलेले पार्ट्स त्यांची माहिती शेजारी देशाला देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.