सेहगल, बिरिंग यांना ५ दिवस पोलीस कोठडी

0
110

रूबी रेसिडेन्सी दुर्घटना प्रकरण
काणकोण येथील रूबी रेसिडेन्सी इमारत दुर्घटना प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या इमारतीचे बिल्डर तथा भारत डेव्हलॉपर्स अँड रिएल्टरचे मालक प्रदीप सिंग बिरींग व जयदीप सेहगल यांना काल येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मुंबईत अटक केली होती. काल त्यांना गोव्यात आणण्यात आले.बिरिंग व सेहगल यांना काल पणजीतील जिल्हा व सत्र न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला. आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांड द्यावा अशी मागणी पोलिसांनी केली होती.
आरोपींच्यावतीने ऍड. अमित पालेकर यांनी बाजू मांडली. वरील आरोपींनी भारत डेव्हलपर्स ऍण्ड रिएलेटर्स ही कंपनी स्थापन करून काणकोण येथे रूबी रेसिडन्सी नावाचा मोठा गृह प्रकल्प उभारला होता. ४ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी उभारलेल्या इमारतींपैकी एक इमारत कोसळली होती व या दुर्घटनेत कित्येक कामगार ढिगार्‍याखाली सापडून ठार झाले होते. या दुर्घटनेनंतर वरील दोन्ही आरोपी फरार झाले होते. एका वर्षानंतर शुक्रवारी मुंबई येथे त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.