सेवा बजावताना जवानाचा मृत्यू

0
7

येथील पणजी अग्निशामक दलाचे जवान वासुदेव हळदणकर (४५ वर्षे, रा. पेडणे) यांचे सेवा बजावत असताना काल दुपारी निधन झाले. दोनापावल एका कारला आग लागल्याची माहिती मिळताच येथील अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कारला लागलेली आग विझविण्याचे काम केल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान वासुदेव हळदणकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अग्निशामक दलाचे जवान वासुदेव हळदणकर यांच्या आकस्मिक निधनाबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या वासुदेव हळदणकर यांना येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.