सॅम्युअलच्या डोक्याला मृत्यूपूर्वी24 तास आधी गंभीर दुखापत

0
9

शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

गावसवाडा म्हापसा येथील सॅम्युअल डी. ब्रागांझा याच्या गोळी लागून झालेल्या मृत्यूच्या सुमारे 24 तास आधी त्याच्या डोक्याला एक गंभीर दुखापत झाली होती, असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सॅम्युअल याच्या मृत्यूप्रकरणी नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, सॅम्युअल मृत्यू प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हापसा पोलीस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप सॅम्युअलचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. पोलिसांनी सुरुवातीला शवविच्छेदन अहवाल देण्यास नकार दिला होता, परंतु नंतर शवविच्छेदन अहवाल दिला.

गोळीबाराच्या घटनेपूर्वी सॅम्युअलला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाबद्दल तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी सॅम्युअल याला पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात आले
होते.

सॅम्युअल याच्या मृत्यूप्रकरणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. सॅम्युअल मृत्यू प्रकरणात सखोल चौकशीची मागणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे.