सूर्यनेल्ली प्रकरणी अर्ज फेटाळला

0
56

येथील स्थानिक न्यायालयाने सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांनी केलेला राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्याविरोधात अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. कॉंग्रेस नेते कुरियन यांचा या प्रकरणात कथित सहभाग असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी पीडित मुलीने केली होती. पुन्हा चौकशी करण्याइतपत सबळ कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे कुरियन यांना दिलासा मिळाला आहे.