राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीबाबत सूचना जारी झाल्यानंतरच दोन्ही जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीमध्ये भाजप-मगो आघाडीने विजय मिळविला आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये भाजप-मगोने पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये भाजप-मगो यांना 13 जागा मिळाल्या आहेत. भाजपने पाठिंबा दिलेला एक अपक्ष उमेदवारही निवडून आला आहे.

