27.2 C
Panjim
Monday, April 19, 2021

सुसंस्कृत लोकनेता

सत्तरीचे लोकनेते आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपल्या विधिमंडळ कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षात नुकतेच पदार्पण केले. एवढा प्रदीर्घ काळ राजकारणासारख्या कमालीच्या अशाश्‍वत क्षेत्रामध्ये – त्यातही गोव्यासारख्या राजकीय बजबजपुरीमध्ये टिकणे आणि तेही आपला आब राखून हे मुळीच सोपे नाही. देशामध्ये अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेले आमदार नाहीत असे नव्हे. महाराष्ट्रातील गणपतराव देशमुखांचा ४७ वर्षे विधानसभा सदस्यत्वाचा जागतिक विक्रम होता. केरळच्या केरळ कॉंग्रेस (मणी) चे नेते के. एम. मणी यांनीही विधिमंडळातील पन्नास वर्षे पूर्ण केली होती. ते आज हयात नाहीत. असे इतरही काही सन्माननीय सदस्य असतील, परंतु राणे यांनी आमदार, मुख्यमंत्री, सभापती आदी विविध पदांवरून चौफेर कार्य करताना राष्ट्रीय पातळीवर स्वतःची एक ‘स्टेटस्‌मन’ म्हणून जी ओळख निर्माण केली आहे, तशी क्वचितच कोणाची झाली असेल. विधानसभेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या या अभिनंदनातून गोव्याच्या राजकीय सुसंस्कृततेचे जे अनोखे दर्शन घडले तेही संस्मरणीय होते.
आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यापेक्षा सभागृहाच्या कामकाजाला प्राधान्य द्या असे नम्रपणे सांगून राणे यांनी आपल्यातील कार्यतत्पर प्रशासकाचे दर्शन घडविले. आपल्या त्रोटक मनोगतामध्ये राणे यांनी जे सांगितले तो राजकारणात येणार्‍या प्रत्येकासाठी मौलिक कानमंत्र ठरावा. ‘आपल्याकडे जे लोक येतात, त्यांचे किमान म्हणणे ऐकून घ्या, शक्य असेल तर त्यांची कामे करा. लोक आशेने येत असतात’ असे राणे म्हणाले. स्वतः आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये राणे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्न आणि समस्यांप्रती किती आस्थेवाईकपणे लक्ष दिले हे गोव्याला ज्ञात आहेच. सत्तरीच्या खेड्यापाड्यांशी, तेथील आपल्या मतदारांशी जे अकृत्रिम जिव्हाळ्याचे नाते राणे यांनी जपले त्याला खरोखर तोड नाही. म्हणूनच तर निवडणुकांमागून निवडणुका ते जिंकून येत आहेत. परवा विधानसभेत विश्वजित यांनी आपल्या पित्याच्या शिस्तीचा एक किस्सा सांगितला तो लक्षात घेण्याजोगा आहे. आपले वडील राज्याचे मुख्यमंत्री असताना सरकारी बंगल्यातील एका दरवाजापलीकडे जाण्याची आपल्याला मुलगा असूनही अनुमती नव्हती. एकदा आपण खिडकीतून एका सरकारी अधिकार्‍याला काही ओरडून सांगताना वडिलांनी आपल्याला पाहिले आणि जमलेल्या शे – दीडशे लोकांसमोर ‘‘पोर्तुगिजांची राजवट केव्हाच संपली. इथे मी मुख्यमंत्री आहे. कोणत्याही सरकारी अधिकार्‍याला झापण्याचा तुला अधिकार नाही’’ अशी आपली कशी खरडपट्टी काढली त्याची जी आठवण विश्वजित यांनी सांगितली ती राणे यांच्या मूल्यनिष्ठेचा दाखला देण्यास पुरेशी आहे.
गोवा आज हीरक महोत्सवी वर्षात आहे. यातील पन्नास वर्षे राणे यांनी ह्या गोव्याची प्रगती अत्यंत जवळून पाहिली आहे. तिच्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. संघप्रदेश गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यापासून राज्यातील भाषिक प्रश्नाची सोडवणूक करण्यापर्यंत अनेक जटिल विषयांना त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मार्गी लावले. कदंब वाहतूक महामंडळाची स्थापना करणे असो अथवा ठिकठिकाणी शासकीय महाविद्यालये स्थापन करणे, उद्योगांना चालना देणे असो, राणे यांनी गोव्याला सतत विकासपथावर ठेवले. कसोटीचे प्रसंग त्यांच्या राजकीय आयुष्यात आलेच नाहीत असे नव्हे. अनेकदा आले. राजकारणातील चढउतार त्यांनाही सोसावे लागले, परंतु त्यातही आपला तोल ढळू न देता आपला आब राखून कसे राहावे त्याचा वस्तुपाठ राणे यांनी आजवर घालून दिला आहे. एवढ्या प्रदीर्घ विधिमंडळ कारकिर्दीमध्ये राणेंनी कधीही सभागृहात आरडाओरडा केल्याचे वा बेशिस्तीचे दर्शन घडविल्याचे एकही उदाहरण नाही. यापुढील आयुष्यामध्येही त्यांनी आपल्या या जन्मजात शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा आदर्श गोव्याच्या राजकारणात पदार्पण करणार्‍या नव्या पिढीपुढे ठेवावा या सदीच्छा.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

साखळीचे लांच्छन!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांना अखेर त्या पदावरून काल पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गटाने दाखल केलेला अविश्वास ठराव...

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू >> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू राज्यातील कोरोना...

एक-दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध ः तानावडे

राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत आवश्यक ते कडक निर्बंध घालण्यात येतील अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष...

साखळी नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव संमत

>> पालिकेत सगलानी गटाचा विजय >> भाजपचे सहाही नगरसेवक गैरहजर साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात...

न्यायालयाने लोकशाही वाचवली : कामत

साखळी पालिकेत नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा जो दारुण पराभव शुक्रवारी झाला त्यावरून राज्यात भाजप सरकारचा शेवट जवळ आला असल्याचे संकेत...