सुर्लचा ‘हिल स्टेशन’ म्हणून विकास करणार

0
4

>> ‘वनविकास’च्या अध्यक्ष दिव्या राणे यांची माहिती

ा डोंगराळ प्रदेशातील गावाचा ‘हिल स्टेशन’ म्हणून विकास करण्यात येणार असल्याची माहिती काल वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे यांनी दिली.

सुर्ल हे गाव नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. सध्या येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरी तेथे त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे तेथे पर्यटकांसाठी सगळ्या सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. निवासासाठी कॉटेजीस, रेस्टॉरंट, सफारी पार्क, ट्रॅकिंगसाठी सोय, प्राणीसंग्रहालय आदी उभारण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्याजवळ जीवरक्षक, तसेच परिसरात पोलीस आणि वनरक्षक यांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. तसेच जैवशौचालयांची आणि कचराकुंड्यांची सोय केली जाईल, असे दिव्या राणे यांनी सांगितले.