सुरेंद्र फुर्तादो, माखिजा यांची निवड निश्‍चित

0
62

महापौर, उपमहापौरपदासाठी दोनच अर्ज

पणजीचे महापौर व उपमहापौर या पदांसाठी निवडणूक अर्ज भरण्याच्या काल शेवटच्या दिवशी विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो व नगरसेवक कबीर पिंटो मखिजा यांच्या व्यतिरिक्त कुणीही वरील दोन्ही पदांसाठी अर्ज न भरल्याने त्या दोघांची अनुक्रमे वरील पदांसाठी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या पार्श्‍वभूमीवर वरील पदांसाठी आज दि. २८ रोजी निवडणूक होणार नाही. मात्र, महापालिका मंडळाची बैठक होणार असून तीत सुरेंद्र फुर्तादो यांची महापौरपदी तर कबीर पिंटो मखिजा यांची उपमहापौरपदी निवड झाल्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार असल्याचे निर्वाचन अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी सांगितले.
 दरम्यान, महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची काल प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आमदार बाबुश मोन्सेर्रात तसेच आपल्या पाठीमागे उभे राहिलेल्या नगरसेवकांचा आपण आभारी असल्याचे सांगितले.