Home बातम्या सुरक्षित स्थळी स्थलांतराचे मुरगाव पालिकेचे आवाहन

सुरक्षित स्थळी स्थलांतराचे मुरगाव पालिकेचे आवाहन

0

मुरगाव पालिकेने आपल्या क्षेत्रातील काही ठिकाणच्या नागरिकांना पावसाळ्यातील सुरक्षा उपाय म्हणून स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. खारीवाडा, सडा, बोगदा, देस्तेरो, बायणा, हार्बर जेटी, मांगूर हिल, वाडे, न्यू वाडे या भागातील कुटुंबांना हे आवाहन करण्यात आले आहे.

या भागांत गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात दरड कोसळणे, पाणी साचणे आदी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा उपाय म्हणून यंदा या परिसरातील लोकांनी आवश्यक त्या सामानासह घरे खाली करून अन्य सुरक्षित स्थळी तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन केले आहे. यापुढे वरील परिसरात घरांत राहणारे स्वत:च्या जबाबदारीवर राहत आहेत, असे समजले जाईल, असेही म्हटले आहे. शिवाय पालिका आणखी कोणतीही सूचना न देता आवश्यक पडेल तेव्हा उचित कारवाई करेल, असे म्हटले आहे.